छत्रपती संभाजीनगर : इंधन दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले असून, गेल्या 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे वाहनचालक, व्यावसायिक तसेच मालवाहतूक क्षेत्रात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पेट्रोलच्या दरात तब्बल 2 रुपये 72 पैशांची वाढ झाली असून, कालपर्यंत 110.37 रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल आज 113.09 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात 2 रुपये 81 पैशांची वाढ झाली असून, कालचे 96.89 रुपये प्रति लिटर असलेले डिझेल आज 99.70 रुपये झाले आहे.

या दरवाढीमुळे रोजच्या प्रवासाचा खर्च वाढणार असून, भाजीपाला, मालवाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि कररचनेमुळे इंधन दर सातत्याने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, नागरिकांकडून सरकारने इंधन दर नियंत्रणात आणावेत अशी मागणी केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,223 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क