छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. यापूर्वी महायुतीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांचा अपवाद वगळता बहुतांश जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत बँकेच्या प्रशासनाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली.

या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेच्या बिगर शेती मतदारसंघात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी ४८ मते मिळवत प्रतिस्पर्धी अभिजीत देशमुख (२६ मते) यांचा २२ मतांनी पराभव केला. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे शिवसेना आमदार संजना जाधव यांनी तब्बल ९८ मते मिळवत दणदणीत विजय नोंदवला. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधातील चारही उमेदवारांना एकही मत मिळाले नाही. शिवसेनेचे प्रभाकर काळे यांनीही ३६ पैकी ३६ मते मिळवत शंभर टक्के ‘क्लीन स्वीप’ केला.

याशिवाय मंत्री अतुल सावे (२६१), रामराव शेळके (२३७), अर्जुन पाटील (२२४), ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (२१०), रवींद्र काळे (१८९), भाजपचे शेषराव जाधव (४९) तसेच ओबीसी मतदारसंघातून सुवर्णा जाधव (७०) यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, अंबादास दानवे, संजना जाधव, प्रभाकर काळे, रवींद्र काळे, अर्जुन पाटील, रामराव शेळके, मुक्ता तांगडे, सुवर्णा जाधव, शेषराव जाधव आणि खासदार कल्याण काळे यांचा समावेश आहे. तर मंत्री संजय शिरसाट, आमदार विलास भुमरे, रमेश बोरणारे, अर्जुन गाडे, अनिल बोरसे, अब्दुल समीर आणि दिनेश परदेशी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. या निकालामुळे जिल्हा सहकार राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,509 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क