छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी दणदणीत विजय मिळवत विधान परिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत सुहास शिरसाट यांना तब्बल ४५४ मते मिळाली, तर ठाकरे गटाचे उमेदवार गणेश लोखंडे यांना केवळ १३४ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप, ठाकरे सेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत रंगली होती.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास शिरसाट यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी कायम ठेवत एकतर्फी विजय संपादन केला. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली.

दरम्यान, पराभवानंतर ठाकरे गटाचे उमेदवार गणेश लोखंडे यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना हा विजय सत्तेचा आणि पैशांचा असल्याचा आरोप केला. निवडणुकीत सत्तेचा प्रभाव आणि आर्थिक बळाचा वापर झाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून, हा विजय विकासकामांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी दाखवलेल्या विश्वासाचा असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. या निकालामुळे स्थानिक राजकारणात भाजपचे वर्चस्व आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

775 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क