मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच विधान परिषद जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर ९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.
या पाच जागांसाठी विद्यमान आमदारांमध्ये सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजीत वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून तयारीला वेग येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*