नागुणीची वाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे, विभागाने शेतात धाड टाकून तब्बल ४२ लाख ७१ हजार ८६० रुपयांचा हिरवट कळीदार ओलसर व सुका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात अदबसिंग तुळशीराम गुसिंगे व जालीमसिंग रुपचंद डेडवाल या शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संचालक प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विभागीय उप-आयुक्त संगीता दरेकर यांच्या देखरेखीखाली आणि अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भरारी पथकाने ही धाडसत्र पार पाडले.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, शेतामध्ये कपाशी व मोसंबीच्या पिकांमध्ये गांजाचे झाडे लपवून ठेवण्यात आले होते. यावेळी पथकाने ४१४.९७ कि. ग्रॅम ओला गांजा आणि १०.००५ कि. ग्रॅम सुक्या गांजाची झाडे जप्त केली आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*