छत्रपती संभाजीनगर : पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बजावलेल्या उल्लेखनीय आणि निष्कलंक सेवेची केंद्र व राज्य सरकारने दखल घेतली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या पोलिस पदकांमध्ये जिल्ह्यातील विविध विभागांतील तब्बल २० अधिकारी व कर्मचाऱ्यांना २१ पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या पदकविजेत्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्त सुभाष नानासाहेब भुजंग यांची कामगिरी विशेष ठरली. त्यांना एकाच वेळी केंद्र सरकारचे ‘राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक’ आणि राज्य सरकारचे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. केंद्रीय आणि राज्यस्तरीय अशा दोन महत्त्वाच्या पदकांचा दुहेरी बहुमान मिळवणारे ते ठरले आहेत.

यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे शहर पोलिस आयुक्तालय, ग्रामीण पोलिस, पोलिस परिक्षेत्र आणि लोहमार्ग पोलिस अशा चारही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष मैदानावर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेलाही मान्यता मिळाली आहे.

‘अति उत्कृष्ट सेवा पदका’मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलिस अधीक्षक प्रकाश बी. जाधव, शहर पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांच्यासह पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक हरीश खटावकर, सहायक फौजदार किरण गावंडे, रफिकखा आदमखा पठाण, संतोष उपहाडे, विक्रम देशमुख आणि पोलिस हवालदार इम्तियाज अहमद यांचा समावेश आहे.

‘उत्कृष्ट सेवा पदका’मध्ये लोहमार्ग पोलिस दलातील निरीक्षक विरयाणी कदम, सहायक निरीक्षक योगेश धोंडे, अमोल देशमुख तसेच ग्रामीण पोलिस दलातील हवालदार संतोषकुमार तांदळे, मोहन सूर्यवंशी, जावेद शहाजाद शेख, दीपक देशमुख, संदीप आव्हाळे आणि अवेझ इक्बाल शेख यांचा गौरव करण्यात आला आहे.

या पदकांमुळे छत्रपती संभाजीनगर पोलिस दलाच्या उत्कृष्ट सेवेला राज्यासह देशपातळीवर अधोरेखित मान्यता मिळाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

694 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क