शहरात दहशत माजवणाऱ्या विकृत रिक्षाचालकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्यानंतर पाच दिवसांपासून फरार असलेला समीर बाबा पठाण हा आरोपी, वेदांत नगर पोलिसांच्या कसोशीमुळे अखेर जेरबंद झाला.
हा विकृत प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा चौक ते कोकणवाडी दरम्यान घडला होता, जिथे १७ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना रिक्षाचालकाने तिला “तुला पैसे लागतात का?” असं विचारून आपली पॅन्ट काढून अश्लील वर्तन केलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र आरोपी फरार झाला होता.
विशेष म्हणजे, आरोपी समीर पठाण दहा दिवसांपूर्वीच दिल्ली गेट परिसरात घडलेल्या एका घटनेत सहभागी असल्यामुळे कारागृहातून बाहेर आला होता. परत आल्यावर त्याने पुन्हा अश्लील कृत्य केल्याने पोलिसांनी त्याच्या शोधात जोरदार मोहीम राबवली होती.
शेवटी, घटनेच्या सहाव्या दिवशी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने शहरात वातावरण शांत झालं आहे. या विकृत रिक्षाचालकाला न्यायालयात हजर करून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*