छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्रसिद्ध श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील राज्य मार्ग क्रमांक २१६ वर भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील जड-अवजड वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

वेरूळ येथील विकास आराखड्यांतर्गत खुलताबाद जंक्शन ते वेरूळ या राज्य मार्ग क्रमांक २१६ वर, श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील भागात भुयारी मार्गाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी उत्खनन तसेच विविध संरचनात्मक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरून जड-अवजड वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

त्यानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वाजेपासून ते २९ मार्च २०२७ रोजी २४.०० वाजेपर्यंत या मार्गावरील जड-अवजड वाहतूक बंद राहणार आहे.

कन्नडहून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक

कन्नडहून वेरूळ–खुलताबाद–दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड-अवजड वाहने आता कन्नड → कसाबखेडा फाटा → वरसडी → माळीवाडा → शरणापूर फाटा → छत्रपती संभाजीनगर या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.

फुलंब्रीहून कन्नड–चाळीसगावकडे जाणारी वाहतूक

फुलंब्रीहून खुलताबाद–वेरूळमार्गे कन्नड किंवा चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांसाठी फुलंब्री → छत्रपती संभाजीनगर → शरणापूर फाटा → माळीवाडा → वरसडी → कसाबखेडा फाटा → वेरूळ हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

कन्नड–चाळीसगावकडून संभाजीनगरकडे येणारी वाहतूक

कन्नड आणि चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड-अवजड वाहने कन्नड → वेरूळ → कसाबखेडा फाटा → वरसडी → माळीवाडा → शरणापूर फाटा → छत्रपती संभाजीनगर या मार्गाने वळविण्यात येतील.

भाविकांच्या हलक्या वाहनांना मार्ग खुला

दरम्यान, श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हलका वाहनांना वेरूळ येथील महावीर चौकापर्यंत जाता येणार आहे. त्यानंतर खुलताबाद–दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाता येईल. तसेच वेरूळहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी वेरूळ–कसाबखेडा फाटा मार्गाचाही वापर करता येणार आहे.

भुयारी मार्गाच्या बांधकामादरम्यान वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी संबंधित कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

967 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क