Oplus_131072

खुलताबाद तालुक्यातील बाजार सांवगी येथे दवाखान्यात जाणारे दोन युवक धांड नदीच्या पाण्याचा वेग अचानक वाढल्याने मोटारसायकलसह वाहून जात होते. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली.

 

रविवारी रात्रीपासून खुलताबाद तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, ज्यामुळे तालुक्यातील नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. यातच ममुराबाद येथील शहाबाज अजहर पटेल (वय १८) आणि परवेझ मजहर पटेल (वय १८), हे दोघे सख्खे चुलत भाऊ बाजार सांवगी येथे दवाखान्यात जात होते. गावाजवळील धांड नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते, याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल पाण्याच्या वेगात वाहू लागली.

दोघांनी मोटारसायकल पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते मोटारसायकलसह वाहून गेले. ग्रामस्थांनी हे दृश्य पाहताच तत्काळ पाण्यात उडी घेतली आणि दोघांना सुमारे ५०० ते ६०० फूट अंतरावरून सुखरूप बाहेर काढले. मात्र, मोटारसायकल पाण्यात वाहून गेली. सुदैवाने दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

खुलताबाद तालुक्यात पावसाचा जोर कायम असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

228 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क