Fake Examinee Caught in 12th Exam Scam

छत्रपती संभाजीनगर: बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने एका तोतया परीक्षार्थीला रंगेहात पकडल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुर्काबाद खराडी येथील हरी ओम ज्युनियर कॉलेज (केंद्र क्र. 0058) येथे भरारी पथकाने अचानक भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला.

कसा पकडला डुप्लीकेट परीक्षार्थी?
भरारी पथकाने केंद्राची तपासणी केली असता एका विद्यार्थ्याबाबत शंका निर्माण झाली. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो अडखळत उत्तरे देत होता. विशेषतः, त्याला वडिलांचे नाव विचारल्यावर त्याने चुकीचे उत्तर दिले. त्याच्या हॉल तिकीटावर खडाखोड झालेली होती आणि केंद्र संचालकाची सही व शिक्का नव्हता. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

कॉपीमुक्त परीक्षेचे अभियान आणि वाढते गैरप्रकार
राज्यात बारावी परीक्षेला सुरुवात झाल्यापासून अनेक परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार समोर आले आहेत. यंदा परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. तरीही काही ठिकाणी कॉपीपुरवठा करणाऱ्या टोळ्यांनी विद्युत खांबावर चढून कॉपी पुरवल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

ही घटना शिक्षण व्यवस्थेसाठी धक्कादायक असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

972 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क