छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसाच्या कर्तव्यावर असताना ई-चलन कारवाईच्या दरम्यान धमकी दिल्याप्रकरणी रिक्षा चालकावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव रहेमान रफिक पठाण (वय 30, रा. भारतनगर,) असे आहे.
ही घटना 1 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सेशन कोर्ट सिग्नलजवळ घडली. पोलिस अंमलदार अतुलसिंग ब्रम्हणावत (वय 40, नेमणूक शहर वाहतूक शाखा-2) हे सहकारी पोलीस अंमलदारासह ड्युटीवर असताना त्यांनी क्रांती चौक रोडवर रिक्षा क्र. MH-20EK-6805 उभी असलेली पाहिली. रिक्षाचा मागील दरवाजा उघडा असल्याने त्यांनी ई-चलन यंत्राद्वारे फोटो काढून कारवाई केली.
सदर रिक्षा चालकाने रिक्षा बाजूला थांबवून पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. चालान टाकल्याच्या रागातून त्याने मोबाईल व ई-चलन मशीन हिसकावून घेतले. त्यानंतर कुटुंबासंदर्भात अयोग्य वक्यव्ये करत धमकी दिली. तसेच “तुम्ही जातीवाद करता, मी काय पाकिस्तानी आहे का? तुला बघूनच घेईन” अशा स्वरूपाच्या धमक्या देऊन गर्दी जमवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. आरोपीवर सरकारी कामात अडथळा, धमकी, आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग करण्याचे कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*