छत्रपती संभाजीनगर : आंघोळ करताना आलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल उचलणे एका ६० वर्षीय निवृत्त नागरिकाला चांगलेच महागात पडले. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’ अशी धमकी देत संशयितांनी तब्बल १४ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २३ मार्च ते २८ एप्रिलदरम्यान घडला असून, जवाहरनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेडा परिसरात राहणारे हे नागरिक २३ मार्च रोजी सकाळी आंघोळ करत असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलल्यावर समोर एक महिला निर्वस्त्र अवस्थेत होती. या महिलेने या नागरिकाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. काही वेळातच ‘हेमंत मल्होत्रा’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ‘तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, आमचे प्रमोद राठोड साहेब बोलतील’ असे त्याने सांगितले. नंतर ‘प्रमोद राठोड पोलिस’ असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली की, ‘तुम्हाला अटक केली जाईल, जेलमध्ये टाकू. सेटलमेंट करायचे असेल तर मल्होत्राशी बोला.’

धास्तावलेल्या या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, मल्होत्रा याने ‘पोलिसांना सांगून सेटलमेंट करू’ असे सांगून विविध क्यूआर कोड आणि बँक खात्यांवर पैसे मागितले. त्यानुसार १४ लाख ६६ हजार रुपये पाठविण्यात आले. नंतर फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंग, तसेच केहरनाथ, छोटूकुमार, दिनेशकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,113 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क