पैठण : मे महिन्यात वाढलेल्या तीव्र उन्हामुळे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून दररोज सुमारे २.०३५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. २ मे रोजी यंदाचे सर्वाधिक बाष्पीभवन नोंदवण्यात आले, जेवढे पाणी केवळ १२ तासांत बाष्पीभूत झाले, ते मराठवाड्याच्या पिण्याच्या व औद्योगिक वापरासाठी तब्बल ६ दिवस पुरले असते.

सध्या जायकवाडी धरणात ३९ टक्के पाणीसाठा असून हे मराठवाड्यातील सर्वाधिक आहे. मात्र, उष्म्याच्या तीव्र झळांमुळे जलसाठ्यावर संकट गडद होत आहे. मे महिन्यात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, त्यामुळे बाष्पीभवनात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण १४५३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ २२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील सर्वाधिक वाटा जायकवाडीचा असला तरी, झपाट्याने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तोदेखील धोक्याच्या पातळीवर जात आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,192 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क