छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून रिमझिम सरींनी हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने रविवारी मात्र जोरदार तडाखा दिला. दुपारी सव्वा एक वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने अवघं शहरच व्यापलं. चिकलठाणा, मुकुंदवाडी परिसरात विशेषतः मुसळधार पावसाने जोर धरला. चिकलठाणा वेधशाळेने तब्बल ५९.४ मिमी पावसाची नोंद केली.

रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने शहरात प्रवेश केला. पावसाचा जोर सुमारे अर्धा तास होता, मात्र या थोडक्याच वेळात अनेक भागात पाणी साचले. रहमेमानिया कॉलनीतील गल्ली क्रमांक ११ मध्ये तब्बल चार फूट पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

एमजीएम विद्यापीठ परिसरात १२.२ मिमी, तर एमजीएम स्कूल पडेगाव येथील केंद्राने ११.२ मिमी पावसाची नोंद केली. दरम्यान, हवामान विभागाने यापूर्वीच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता, तो रविवारी खरा ठरला.

हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी पुढील सहा दिवस दररोज पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे जुना मोंढा येथील रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात ग्राहक व व्यापाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. तसेच नवीन तयार झालेला छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्ग देखील पहिल्याच पावसात पाण्यात गेल्याचे पाहायला मिळाले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,657 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क