पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलैदरम्यान, तर दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलैदरम्यान होणार आहे.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा बारावीचा निकाल ५ मे रोजी, तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालात अनुत्तीर्ण झालेले, एटीकेटी मिळवलेले तसेच श्रेणी सुधारणा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी ही पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.

याआधी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होत असे. मात्र यंदा परीक्षा वेळेपूर्वी म्हणजेच जून महिन्याच्या अखेरीसच घेण्यात येणार आहे. मंडळाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक हे केवळ माहितीस्तव आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणारे छापील वेळापत्रकच अंतिम आणि ग्राह्य धरले जाणार आहे.

तसेच, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जून ते ११ जुलैदरम्यान पार पडणार आहेत. बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांच्या परीक्षा अनुक्रमे १५ जून आणि १६ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाची खात्री शाळेकडून मिळणाऱ्या अधिकृत प्रतीवरूनच करून घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

464 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क