रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करत ५० बेसिस पॉइंट्सनी घट केली आहे. यामुळे आता रेपो रेट ६ टक्क्यांवरून थेट ५.५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
या निर्णयामुळे बँकांकडील कर्जांचे व्याजदर कमी होण्याची शक्यता असून, विशेषतः होम लोन आणि कार लोन घेणाऱ्यांना थेट फायदा होणार आहे. म्हणजेच, कर्ज घेतलेल्यांचा मासिक हप्ता (EMI) आता कमी होणार आहे.
रेपो रेट म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या तात्पुरत्या कर्जावरील व्याजदर. बँका याच दराच्या आधारावर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांचे व्याजदर निश्चित करतात. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात झाल्यास बँकांकडील कर्ज स्वस्त होते.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने २० लाखांचे गृहकर्ज २० वर्षांच्या कालावधीसाठी ९ टक्के वार्षिक व्याजदराने घेतले असेल, तर त्याचा सध्याचा EMI सुमारे १७,९९५ रुपये आहे. मात्र, रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर हा हप्ता सुमारे १७,३५६ रुपये इतका कमी होणार आहे.
याआधी आरबीआयने दोन वेळा अनुक्रमे ५ आणि २५ बेसिस पॉइंट्सनी कपात केली होती. सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन पतधोरण समितीने ही मोठी कपात केली आहे. वाढती महागाई आणि सामान्य कर्जदारांवरील आर्थिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.
हा निर्णय आर्थिकदृष्ट्या स्थैर्य आणि व्यवहारक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*