छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या अट्टल चोरट्याला वाळुज पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याच्या मुसक्याचं आवळत पोलिसांनी तब्बल १.३४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

१० जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी दागिने घालून बाहेर पडण्याचा गैरफायदा घेत आरोपीने जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला लक्ष्य करत तिच्या गळ्यातील तीन तोळ्यांचा सोन्याचा हार हिसकावून पलायन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सायंकाळी वाळुज परिसरातील शिवाराई भागातही एकट्या शेतमजूर महिलेला टार्गेट करत तिच्या गळ्यातील पोत हिसकावन्यात आली होती. वाळुज पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर पोलिसांनी तात्काळ टोलनाके आणि हॉटेल्सच्या CCTV फूटेजच्या आधारे दोन आरोपी स्पोर्ट्स बाईकवरून जात असल्याचे हेरले. त्यापैकी एक आरोपी गणेश विजय चव्हाण (वय २५, रा. अशोकनगर, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन तोळ्यांचा सोन्याचा गंठण आणि १४ हजारांचे मनी मंगळसूत्र असा एकूण १,३४,००० रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, उप आयुक्त नादेडकर, सहाय्यक आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे व पीएसआय अजय शितोळे यांच्या पथकाने केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,668 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क