मुंबई : ‘बिग बॉस १३’ मधून घराघरात पोहोचलेली आणि ‘काँटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२व्या वर्षी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, २७ जून रोजी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केलं.

शेफालीच्या पतीने – अभिनेता पराग त्यागी याने आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला अंधेरीतील रुग्णालयात दाखल केलं होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या तिच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

शेफालीच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे. अभिनेता अली गोनी आणि राजीव अदातिया यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला.

शेफाली जरीवालाच्या जाण्यानं संपूर्ण टीव्ही आणि चित्रपटसृष्टी हळहळली आहे. ‘काँटा लगा’ या आयकॉनिक गाण्यामुळे अजरामर झालेली ही अभिनेत्री चाहत्यांच्या मनात कायमची घर करून राहील.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,473 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क