मुंबई : शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात दरवर्षी हजारो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. या निष्ठावान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वारीदरम्यान अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात महसूल विभागाने आजच अधिकृत परिपत्रक जारी केले.

ही योजना १६ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. आत्महत्या, खून किंवा स्वखुशीने विषप्राशन केल्यास ही मदत लागू होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्यासाठीही सरकारने विशेष आर्थिक तरतुदी केल्या आहेत:

  • ४०% ते ६०% अपंगत्व – ₹७४,०००
  • ६०% पेक्षा जास्त अपंगत्व – ₹२.५ लाख
  • ८ दिवसांहून जास्त रुग्णालयात उपचार – ₹१६,०००
  • ८ दिवसांपेक्षा कमी उपचार – ₹५,४००

याशिवाय, आरोग्य विभागाकडून वारी मार्गावर आरोग्य शिबिरे, कार्डियॅक रुग्णवाहिका आणि तात्पुरते आयसीयू बेड्स उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्र्यांना थेट पंढरपूरला जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक प्रमुख दिंडीसोबत सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

हा निर्णय वारकऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

623 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क