कन्नड : शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या कन्नड नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाचा काही भाग गुरुवारी (३ जुलै) दुपारी २.३० वाजता अचानक कोसळला. या दुर्घटनेत वरच्या मजल्यावरील आठ गाळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, सुमारे २० गाळ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ही इमारत दोन टप्प्यांत बांधण्यात आली होती. १९८०-८१ मध्ये खालचे २० गाळे आणि २००४-०५ मध्ये वरचे आठ गाळे बांधण्यात आले होते. यातील वरचा संपूर्ण भाग कोसळला आहे. 

घटनास्थळी मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नगरपरिषदेचे अधिकारी प्रशांत देशपांडे, राजेंद्र सोनार, रमेश थोरात, तसेच पोलिस उपनिरीक्षक नासेर पठाण आणि कर्मचारी वर्ग घटनास्थळी उपस्थित आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,811 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क