छत्रपती संभाजीनगर – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल गुरुवारी (३ जुलै) दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्तासह पडेगाव रोड परिसरात मोठी कारवाई केली. तब्बल ४३ वर्षांनंतर या भागातील अतिक्रमणांवर हातोडा पडला असून पडेगाव व मिटमिटा मार्गावर मुंबई हायवेलगत असलेली ५८५ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मिटमिटा शाळेपर्यंतची अतिक्रमणे हटवण्यात आली. यामध्ये मोठ्या इमारतींसह पक्की व कच्ची घरे, हॉटेल, लॉज, दुकाने, शेड, कंपाउंड वॉल, गॅरेज, वॉशिंग सेंटर, जाहिरात फलक, ओटे, कमानी यांचा समावेश होता. अतिक्रमण हटवताना काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शविला, काहींनी स्वतःहून अतिक्रमण हटवले, तर काही ठिकाणी विनंती करूनही वेळ न दिल्याने तणाव निर्माण झाला.

मात्र कुणालाही विशेष वागणूक दिल्याच्या आरोपांवर अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत सांगितले की, “कोणत्याही अतिक्रमणधारकाला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही.”

ही कारवाई आज शुक्रवारी (४ जुलै) ही सुरू राहणार असून, मनपा व पोलीस प्रशासनाने ६०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या मोहिमेत उतरवला आहे. यामध्ये ३० जेसीबी, ८ पोकलेन, १५ टिप्पर, ५ हायड्रॉलिक वाहने, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने व २ अग्निशमन बंबांचा समावेश आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे वर्षांनुवर्षे अतिक्रमणाने अडवलेली रस्त्यांची रुंदी आणि सार्वजनिक वाहतूक यामध्ये मोकळीक मिळणार आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,737 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क