छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोना आणि डेंग्यूच्या साथीने रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी, कोरोनाचे ५ नवे रुग्ण आढळले असून, एका रुग्णाला डेंग्यू सदृश लक्षणे आढळून आली आहेत. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आरोग्य विभागाने नागरिकांना सावधानतेचे आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत, शहरात घराघरांत सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत, त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ७ कोरोना रुग्ण आढळल्यानंतर, आणखी ५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे.
मनपा आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे. या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन सर्व आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*