छत्रपती संभाजीनगर :  वैजापूर पोलिस ठाण्यात हेडकॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या रवींद्र साळवे यांनी अमेरिकेतील अलाबामा, बिरमिंघम येथे पार पडलेल्या २१ व्या वर्ल्ड पोलिस अ‍ॅण्ड फायर गेम्स २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत भारताचा तिरंगा डौलाने फडकवला. त्यांनी पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदक आणि बेंच प्रेस प्रकारात कांस्य पदक पटकावत दुहेरी पदक जिंकून भारताच्या यशात भर घातली आहे.

ही स्पर्धा २६ जून ते ७ जुलैदरम्यान झाली असून, यात ९० हून अधिक देशांतील हजारो पोलिस आणि अग्निशमन कर्मचारी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. जागतिक स्तरावर भारतीय पोलिस दलाची क्रीडा क्षेत्रातील ताकद दाखवून देत साळवे यांनी पुन्हा एकदा आपल्या फिटनेस आणि कौशल्याची छाप उमटवली. हे त्यांच्या कारकिर्दीतील दुसरे सुवर्णपदक असून, यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी कोलंबिया (दक्षिण अमेरिका) येथे झालेल्या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.

त्यांच्या या यशाबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंग, SDPO भागवत फुंदे, पूजा नागरे, पोलिस निरीक्षक रवीकुमार दरवडे, तसेच पोलिस सहकारी सत्यजित ताईतवाले, जगेश दैत्य, सुरेश वर्मा, सौरभ कल्लोळे, वैभव थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

हे यश केवळ रवींद्र साळवे यांचेच नाही, तर वैजापूर पोलीस दलाचाही गौरव असून, त्यांनी सर्वच पोलिसांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,278 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क