छत्रपती संभाजीनगर : बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचंड गुंतवणुकीचा ईव्ही वाहन निर्मिती प्रकल्प सुरू करणारी टोयोटा किर्लोस्कर मोटार्स (टीकेएम) कंपनी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) स्थानिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम राबविणार आहे. कंपनी बिडकीन येथे अत्याधुनिक शाळेची उभारणी करणार असून, या संदर्भात महिनाअखेरीस जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करार होणार आहे.

शुक्रवारी (दि.१८) कंपनीचे जनरल मॅनेजर रवी सोनटक्के आणि प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी.एस. यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. शाळेच्या उभारणीसंदर्भातील प्राथमिक चर्चेनंतर कराराच्या मसुद्यावर काम सुरू असून, करार झाल्यानंतर शाळेच्या स्वरूप, सुविधा आणि प्रकल्पाच्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

टीकेएम कंपनी बिडकीन औद्योगिक वसाहतीतील ८२७ एकर जागेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ईव्ही वाहन निर्मिती प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पामुळे थेट सुमारे आठ हजार जणांना रोजगार मिळणार असून, अप्रत्यक्षरित्या दीड हजारांपर्यंत रोजगारनिर्मिती होईल. प्रकल्प सध्या उभारणीच्या टप्प्यात असून, स्थानिक विकास आणि सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन कंपनी सीएसआर निधीतून शिक्षण, पायाभूत सुविधा आणि इतर सामाजिक प्रकल्पांना गती देत आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, बिडकीन परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण देणारी ही शाळा उभारली जाणार आहे. स्थानिकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, हा कंपनीच्या सीएसआर धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याचे सोनटक्के यांनी स्पष्ट केले.

या शाळेमुळे बिडकीन आणि आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. करारानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,387 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क