छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वेरूळ येथे रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली. कैलास लेणी परिसरातील जोगेश्वरी लेणीसमोरील कुंडात विद्यार्थ्यासह त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव चेतन संजय पगडे असून शिक्षकाचे नाव राजवर्धन अशोक वानखेडे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विटखेडा येथील वेदांत अभ्यासिका क्लासेसची सहल रविवारी सकाळी वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी आली होती. या सहलीमध्ये पाच मुली व तीन मुले असे आठ ते नऊ विद्यार्थी सहभागी होते. सर्व विद्यार्थी लेण्यांच्या परिसरातील पाण्यात खेळत होते. याचदरम्यान चेतन पगडे याचा पाय घसरून तो कुंडात पडला. चेतनला वाचविण्यासाठी शिक्षक राजवर्धन वानखेडे कुंडात उतरले. मात्र चेतनने घाबरून शिक्षकांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिकांनी धाव घेतली पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षण क्षेत्रातील एक जबाबदार शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,718 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क