छत्रपती संभाजीनगर : सातारा येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत अर्जित रजा मंजुरीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी मुख्याध्यापक आणि संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शाळेतील एका महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकांकडे अर्जित रजेसाठी अर्ज केला होता. परंतु रजा मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापक सोमनाथ भावले (५२, रा. वसंत विहार, बीड बायपास) यांनी संगणक ऑपरेटर गणेश कोथिंबिरे (२६, रा. सातारा गाव) याच्या माध्यमातून तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. या मागणीने संतप्त झालेल्या शिक्षिकेने थेट एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

त्यानंतर बुधवारी एसीबीने शाळेतच सापळा रचून कोथिंबिरेला लाच घेताना पकडले व त्यानंतर मुख्याध्यापक भावले यांनाही ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पथकाने २० हजार रुपयांची लाच रक्कम, तसेच दोघांकडील दोन मोबाईल जप्त केले.

या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष सापळा उपअधीक्षक संगीता एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमादार सचिन बारसे, अंमलदार राजेंद्र नंदिले, दीपक ईगले, सी. एन. बागूल यांनी रचला. या कारवाईने शिक्षण विभागात भ्रष्टाचाराला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

955 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क