छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात नवे पाहुणे दाखल झाले आहेत. कर्नाटकातील शिवमोगा प्राणिसंग्रहालयातून दोन सिंह, दोन अस्वल आणि दोन कोल्हे येथे आणण्यात आले आहेत. प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत सिद्धार्थ उद्यानाने शिवमोगा प्राणिसंग्रहालयाला एक पांढरा वाघ व दोन पिवळे वाघ दिले आहेत. त्यामुळे उद्यानातील प्राण्यांची विविधता आणखी वाढली असून प्रेक्षकांसाठीही हा नवा अनुभव ठरणार आहे.

प्राण्यांना नवीन ठिकाणी आणल्यानंतर सुरुवातीला काही दिवस त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पिंजऱ्यातच ठेवले जाणार आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांचे आरोग्य तपासले जात आहे. दोन ते तीन दिवसांत ते पूर्णपणे जुळवून घेतल्यानंतर त्यांना मोकळ्या पिंजऱ्यात सोडले जाणार आहे. त्यानंतरच हे प्राणी प्रेक्षकांसाठी पाहणीकरीता उपलब्ध केले जातील.

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात आधीपासूनच अनेक दुर्मिळ व आकर्षक प्रजाती आहेत. आता नव्याने आलेल्या सिंह, अस्वल व कोल्ह्यांमुळे उद्यानाची शोभा अधिक खुलणार आहे. प्राण्यांच्या अदलाबदलीमुळे दोन्ही प्राणिसंग्रहालयांना नवीन प्रजातींचा अनुभव घेता येतो, तसेच प्राण्यांच्या संवर्धनालाही हातभार लागतो. त्यामुळे प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,916 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क