छत्रपती संभाजीनगर :  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ई (छत्रपती संभाजीनगर ते पैठण) या महत्त्वाच्या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, बिडकीन परिसरात सध्या पीक्यूसी (PQC) चे काम सुरू आहे. या कामानंतर बिडकीन शहरातील निलजगाव फाटा ते बिडकीन दरम्यान काँक्रीट रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत सुरक्षित आणि सुयोग्य वाहतूक व्यवस्थेसाठी तात्पुरते मार्गबदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी शुक्रवारी जारी केले आहेत.

वाहतुकीत करण्यात आलेल्या या बदलांचा कालावधी शनिवार, ४ ऑक्टोबरपासून शनिवार, १८ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. या काळात बिडकीन डीएमआयसीकडून निलजगाव फाटामार्गे बिडकीन शहरात येणारी सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक बदलाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

पूर्वी कचनेर–निलजगाव–बिडकीन निलजगाव फाटा–बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहने आता कचनेर–निलजगाव–बिडकीन डीएमआयसी–इंड्यूरन्स कंपनी जवळून–शेकटा फाटा–बिडकीन मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहेत.

तसेच, वाळुज–शेंदुरवाडा–शेकटा–शेकटा फाटा–बिडकीन–निलजगाव फाटा–बिडकीन डीएमआयसी–निलजगाव मार्गे कचनेर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी आता बदललेला मार्ग वाळुज–शेंदुरवाडा–शेकटा–शेकटा फाटा–इंड्यूरन्स कंपनी जवळून–बिडकीन डीएमआयसी–निलजगाव मार्गे कचनेर असा असेल.

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर–निलजगाव फाटा–बिडकीन डीएमआयसी–निलजगाव मार्गे कचनेर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी छत्रपती संभाजीनगर–निलजगाव फाटा–बिडकीन–शेकटा फाटा–इंड्यूरन्स कंपनी जवळून–बिडकीन डीएमआयसी–निलजगाव मार्गे कचनेर हा पर्यायी मार्ग ठरविण्यात आला आहे.

तसेच कचनेर–निलजगाव–बिडकीन डीएमआयसी–निलजगाव फाटा–बिडकीन–शेकटा फाटा–शेकटा–शेंदुरवाडा मार्गे वाळुज कडे जाणाऱ्या वाहनांसाठी बदललेला मार्ग कचनेर–निलजगाव–बिडकीन–इंड्यूरन्स कंपनी जवळून–शेकटा फाटा–शेकटा–शेंदुरवाडा मार्गे वाळुज असा असेल.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक अधिक सुलभ, वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, या कालावधीत वाहतुकीत बदलामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वाहनचालकांनी संयम बाळगावा, वाहतूक चिन्हांचे पालन करावे आणि पोलीसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,098 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क