मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी आता आपली तयारी अंतिम टप्प्यात नेण्याची वेळ आली आहे.

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ पर्यंत पार पडेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत — पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण — या ठिकाणी परीक्षा घेण्यात येणार आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षा देखील आयोजित करण्यात येतील. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची लेखी परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहे.

याशिवाय प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा यांचे वेळापत्रक देखील मंडळाने जाहीर केले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अभ्यासक्रम अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडेल. दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा मात्र २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत होईल. यावेळी शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत.

शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, या तारखा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आधीपासूनच जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे परीक्षेपूर्वीचा ताण कमी होईल आणि तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) प्रकाशित करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी मंडळाच्या वेबसाइटवर नियमित लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळापत्रकामुळे राज्यातील जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आता आपल्या अंतिम अभ्यासाच्या तयारीस लागले असून, शाळा आणि महाविद्यालयांनीही लेखी परीक्षांसाठी नियोजन सुरू केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,165 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क