छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात रविवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांपैकी दोनच जलवाहिन्या सुरू राहिल्या. त्यामुळे सुमारे दीड तास शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहिला आणि नंतर तो विस्कळीत झाला. या घटनेमुळे पाणीपुरवठा सुमारे ६२ एमएलडीने घटल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

फारोळा केंद्रातून शहराला ७००, ९०० आणि १२०० मि.मी. व्यासाच्या तीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या बिघाडामुळे तिन्ही जलवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद झाला. पाणीपुरवठा विभागाने तातडीने तपासणी सुरू केली असता ९०० मि.मी. जलवाहिनीच्या वीजवाहिनीमध्ये मोठा बिघाड आढळला. त्यामुळे ती लाइन बंद ठेवून उर्वरित दोन जलवाहिन्यांतून पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. परंतु, वारंवार वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे गेल्या चार दिवसांपासून जलपुरवठा यंत्रणा त्रस्त आहे. यापूर्वी ढोरकीन येथेही अशाच प्रकारचा बिघाड झाल्याने तब्बल १२ तास पाणीपुरवठा ठप्प झाला होता.

महापालिकेच्या मते, ९०० मि.मी. जलवाहिनी बंद असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात ६२ एमएलडीने घट झाली आहे. त्यामुळे काही भागांत पाण्याचे टप्पे उशिराने येणार असून काही ठिकाणी टप्पे पुढे ढकलावे लागतील. महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

419 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क