छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात रविवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीच्या शेजारील पार्किंगजवळील विहिरीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले होते. बेगमपुरा पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपासून सुमारे ५० फूट अंतरावर असलेल्या झाडाखालील अर्धवट बुजलेल्या विहिरीतून सकाळी दुर्गंधी येऊ लागली. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी ही बाब सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विहिरीत पाहिले असता एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड, ड्यूटी ऑफिसर दीपराज गंगावणे, जवान संग्राम मोरे, प्रसाद शिंदे, प्रणाल सूर्यवंशी, मनसुब सपकाळ, विक्रांत बकले, लव घुगे आदींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात मृतदेहावर कोणतेही जखम किंवा व्रणाचे चिन्ह आढळलेले नाही. पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे की मृतदेह दोन दिवसांपासून विहिरीत पडलेला असावा. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही असून ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात भीती आणि चर्चा वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,163 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क