छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 01 नोव्हेंबर 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करून मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनुसार पात्र मतदारांची तपासणी करून उद्या, 03 डिसेंबर 2025 रोजी पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

प्रारूप यादीमध्ये समाविष्ट नावांबाबत कोणताही दावा अथवा विद्यमान नोंदीतील त्रुटींसंदर्भात हरकत नोंदवायची असल्यास मतदारांना 18 डिसेंबर 2025 या अंतिम तारखेपूर्वी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन नाव समाविष्ट करणे, चुकीचे नाव वगळणे किंवा तपशीलामध्ये आवश्यक बदल करणे यासाठी अनुक्रमे नमुना क्रमांक 18, 7 आणि 8 चा वापर करून हरकती नोंदविता येणार आहेत.

परीक्षणासाठी प्रारूप मतदार यादीची प्रत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसिल कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे पात्र मतदारांना आपल्या नावाची नोंद तपासण्याची आणि आवश्यक बदल करण्याची संधी सहज उपलब्ध होणार आहे.

निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघातील नोंदणी प्रक्रियेची पारदर्शकता आणि अचूकता कायम ठेवण्यासाठी संबंधित कार्यालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मतदार नोंदणी ही लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पायरी असल्याने पात्र पदवीधरांनी ही संधी साधून योग्य त्या सुधारणा निर्धारित तारखेपूर्वी कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,119 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क