कन्नड (kannad )तालुक्यातील मौजे माटेगाव येथे एक साडे चार वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह घराशेजारील विहिरीत संशयितरित्या आढळून आला. या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पुढील तपासात मुलाच्या चुलतीने त्याचा घातपात (Murder)केल्याचे निष्पन्न झाले आहे.

देवगाव रंगारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटेगांव येथील गणेश हिरामण जाधव आणि सागर हिरामण जाधव हे दोघे भाऊ एकत्रित शेती करत आहेत. गणेश जाधव यास दोन मुले, पत्नी असून सागर जाधव यास एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

घटनेच्या काही दिवसांपूर्वी, सागर जाधव यांचा मुलगा सार्थकने खेळता खेळता आरोपी सुनिता गणेश जाधव हिच्या मुलाच्या डोळ्यात चुकून चुना टाकला, ज्यामुळे त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. या प्रकारामुळे सुनिताच्या मनात राग निर्माण झाला. तसेच, तिला जाऊला भविष्यात मुलंबाळ होणार नसल्याचे माहीत होते. म्हणून, इस्टेटीवर ताबा मिळविण्याच्या आणि बदला घेण्याच्या उद्देशाने तिने सार्थकला ठार मारण्याचे ठरविले.

३१ जुलै रोजी सकाळी, संधी साधून, सुनिताने सार्थकला शेजारील विहिरीत फेकले. मुलगा हरविल्याचे लक्षात येताच, त्याच्या वडिलांनी त्याचा शोध घेतला, पण तो आढळून आला नाही. पोलिसांनी तपासात सुनिताचे वागणे संशयास्पद आढळल्याने तिला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यावर तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीतील तपासादरम्यान पोलिसी खाक्या दाखवल्यावर तिने आपल्या कृत्याची कबुली दिली. यावरून तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,422 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क