छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेच्या काळात जातीय सलोखा बिघडवणारे कृत्य, चिथावणीखोर मजकूर तसेच अफवा पसरवण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने सायबर पेट्रोलिंग अधिक तीव्र केली आहे. सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत असून आतापर्यंत सायबर सेलने २७ आक्षेपार्ह पोस्ट्स हटविल्या आहेत. विशेषतः सोशल मीडिया रिल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गाण्यांद्वारे अप्रत्यक्ष प्रचार किंवा द्वेषपूर्ण संदेश दिला जात असल्याने त्यावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

सोशल मीडियावर सतत नजर ठेवण्यासाठी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ९ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. हे पथक फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर २४ तास लक्ष ठेवून आहे. रिल्स, व्हिडिओ, पोस्टमधील शब्दरचना, आशय आणि त्यामागील संदेश तपासून आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास तात्काळ संबंधित पोस्ट हटवण्याची कारवाई केली जात आहे. एखाद्या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आढळल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, नागरिकांनीही सोशल मीडियाचा वापर करताना अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. कोणतीही पोस्ट, व्हिडिओ किंवा बातमी पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी. चिथावणीखोर, द्वेषपूर्ण किंवा जात, धर्म, समाज अथवा पक्षाविरोधात अवमानकारक मजकूर पोस्ट करू नये. व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रुप अॅडमिनवर राहणार असल्याने ‘ओनली अॅडमिन’ सेटिंगचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच वैयक्तिक टीका, चारित्र्यहनन करणारे रिल्स व व्हिडिओ शेअर करू नयेत. कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ती सोशल मीडियावर तात्काळ रिपोर्ट करून ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

465 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क