छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (दि. ३०) हा शेवटचा दिवस ठरला. या अंतिम दिवसापर्यंत एकूण १,८७० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत सकाळपर्यंतही ठोस निर्णय न झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते.

स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा होताच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांची एकच धावपळ सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांवर मोठी गर्दी उसळली. दुपारी ३ वाजेपूर्वी कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवारांना आत घेऊन दरवाजे बंद करण्यात आले. काही ठिकाणी टोकन वाटप करून मुदत संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे अंतिम मुदतीनंतर कार्यालयात पोहोचलेल्या उमेदवारांचेही अर्ज स्वीकारण्यात आले.

अनेक कार्यालयांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक उमेदवार वाहनांच्या ताफ्यासह कार्यालयांवर पोहोचले होते. यावेळी समर्थकांकडून घोषणाबाजी, फटाके फोडणे असे प्रकार दिसून आले.

उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहने रस्त्यालगत उभी केल्यामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सिल्लेखाना परिसर, जालना रोडवरील मोंढा नाका, टीव्ही सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय, तसेच सिडकोतील मनपा झोन कार्यालय परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. काही भागांत वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेवटच्या दिवसाच्या या गोंधळामुळे निवडणूक वातावरण चांगलेच तापल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रभागनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०१- (प्रभाग ३,४,५) १८९ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०२-(प्रभाग १५,१६,१७) २०८ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०३-(प्रभाग ६,१२,१३,१४) १७४ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०४- (प्रभाग १,२,७) १८२ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०५-(प्रभाग ८,९,१०,११) २३३ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०६- (प्रभाग २३, २४,२५) २०४ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०७-(प्रभाग २१,२२,२७) २३६ अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०८- (प्रभाग २६,२८,२९) २५० अर्ज

निवडणूक निर्णय अधिकारी-०९-(प्रभाग १८,१९,२०) १९४ अर्ज

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

765 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क