श्रीनिकेतन कॉलनी, गौतम नगर आणि रोकडा हनुमान कॉलनी परिसरात प्रभाग क्रमांक १६ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू वाडेकर यांचा जोरदार प्रचार करत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या भागातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आशीर्वाद मागितले तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रचारादरम्यान राजू वाडेकर यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला. या भेटींमध्ये पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्ट्रीटलाइट्स आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली. अनेक नागरिकांनी परिसरातील दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी वाडेकर यांनी सर्व समस्या ऐकून घेत लवकरात लवकर त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

राजू वाडेकर यांनी आपल्या संवादात सांगितले की, प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आपला प्रमुख अजेंडा आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत सुविधांबरोबरच युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांसाठी सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी-सुविधा वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल. “नागरिकांच्या विश्वासावर निवडणूक लढवत असून, निवडून आल्यानंतर प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रचार भेटींमध्ये भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या धोरणांची माहिती दिली. अनेक ठिकाणी मतदारांनी राजू वाडेकर यांचे स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शविला.

एकूणच प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजू वाडेकर यांचा प्रचार उत्साहात सुरू असून, मतदारांशी थेट संपर्क साधत विश्वास निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हा प्रचार महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे चित्र दिसत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

682 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क