छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षाद्वारे गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. गुरुवारी (ता. १९) रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तीसगाव चौफुली मार्गावर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संबंधित रिक्षा अडवली. तपासणीदरम्यान तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेला आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तिची आई आणि सावत्र वडिलांना ताब्यात घेतले आहे.

मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आई-वडिलांनी पोलिसांना दिली. मात्र, आत्महत्या झाल्याचा दावा करत असताना पोलिसांना न कळवता मृतदेह परस्पर गावी का नेत होते आणि तो गादीत गुंडाळण्याची गरज काय होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे मृतदेह तात्काळ घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

दरम्यान, एका जागरूक नागरिकाने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून संशयास्पद हालचालींची माहिती दिल्याने हा प्रकार उघड झाला. संबंधित तरुणी काही दिवसांपासून एका तरुणासोबत वडगाव कोल्हाटी येथे भाड्याच्या घरात राहत होती. घरमालकाला त्यांनी पती-पत्नी असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर प्रेमसंबंधातून काही वाद झाला होता का, किंवा प्रेमविवाहाच्या कारणावरून गुन्हा घडला का, याबाबतही शंका उपस्थित होत आहे.

सध्या पोलिस खून आणि आत्महत्या या दोन्ही शक्यतांवरून तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,472 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क