पैठण : संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीत लाखो वारकरी भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच चोरी, पाकिटमारीसारख्या गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाकिटमारी, पोत व किमती वस्तू चोरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पैठणमध्ये दाखल होतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तात १ डीवायएसपी, २ पोलिस निरीक्षक, ३२ उपनिरीक्षक, ८ सहायक पोलिस उपनिरीक्षक, ३४५ पोलिस कर्मचारी, ७६ महिला कर्मचारी, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा पथक, दंगा नियंत्रण पथक तसेच १७८ पुरुष व महिला होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.

याशिवाय साध्या वेशातील पोलिस कर्मचारी आणि दामिनी पथकही तैनात ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांतील पोलिस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. संत एकनाथ महाराजांची दोन्ही मंदिरे, बसस्थानक परिसर, धरण व गोदावरी नदी वाळवंट परिसर तसेच यात्रा मैदानातील मनोरंजन स्टॉल परिसरात विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, ९ ते ११ मार्च दरम्यान यात्रेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शहरालगतच्या गोल नाका आणि तहसील कार्यालयासमोर तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. मान्यवर व्यक्तींसाठी वाहन प्रवेश पासची व्यवस्था करण्यात आली असून शहरातील व्यापारी व नागरिकांनी अत्यावश्यक प्रसंगीच वाहनांचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

457 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क