छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात बुडून दोन युवा मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ६) उघडकीस आली. शेख रिहान शेख अहमद (वय १८, रा. बायजीपुरा) आणि इम्रान शेख इरफान शेख (वय १७, रा. नायगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बायजीपुरा येथील शेख रिहान शेख अहमद आणि नायगाव येथील इम्रान शेख इरफान शेख हे दोघेही जिवलग मित्र होते. गुरुवारी सायंकाळी ते दोघे गणोरी-नायगाव रस्त्यालगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात उडी मारल्यानंतर पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत हे दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. शुक्रवारी सकाळी स्थानिकांना तलावाजवळ संशयास्पद हालचाल दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या पथकाने तलावात शोधमोहीम राबविली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद फुलंब्री पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

952 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क