छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या गडबडीत घरात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर नातेवाईक दाम्पत्यानेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्येत बिघडल्याचे कारण सांगून घराची चावी घेऊन गेलेल्या दाम्पत्याने कपाटातील सुमारे १२.७ तोळे सोने आणि ३०० ग्रॅम चांदी असा जवळपास २० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनोज मंगेश बोंबले (वय ३४, रा. मछली खडक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २६ फेब्रुवारी रोजी बोंबले यांच्या नातेवाइकांचा लग्नसमारंभ असल्याने त्यांच्या घरी अनेक पाहुणे आले होते. घरातील कपाटात सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेले होते. लग्नसमारंभासाठी दुपारी कुटुंबातील सर्व सदस्य गारखेडा येथील एका हॉटेलमध्ये गेले होते.

दरम्यान, नातेवाईक निखील राजेंद्र टिकार (रा. धनकवडी, पुणे) हा त्याची पत्नी वर्षा टिकार हिची तब्येत बिघडल्याचे सांगत बोंबले यांच्या वडिलांकडे आला. पत्नीला थोडा आराम करायचा असल्याचे सांगून घराची चावी मागितली. त्यामुळे बोंबले यांच्या वडिलांनी समोरील ‘अमर किड्स अॅण्ड रेडिमेड’ या दुकानात ठेवलेली घराची चावी घेऊन त्यांना घरात जाऊन आराम करण्यास सांगितले.

यानंतर निखील टिकार व त्याची पत्नी दुपारी सुमारे २.३० वाजता घरात गेले आणि सुमारे ४.३० वाजता चावी परत दुकानात देऊन लग्नस्थळी परत आले. काही दिवसांनी, ३ मार्च रोजी बोंबले यांच्या आजीच्या ऑपरेशननंतर त्यांच्या गळ्यातील पोत घेण्यासाठी आई प्रमिला बोंबले यांनी कपाट उघडले असता पोत दिसून आली नाही. त्यानंतर इतर दागिने तपासले असता तेही गायब असल्याचे लक्षात आले.

चोरट्यांनी कपाटातून १०० ग्रॅम सोन्याचे बिस्कीट, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, १० ग्रॅम सोन्याची मनीपोत, ६ ग्रॅम सोन्याचे वेल, १ ग्रॅम सोन्याचे टॉप्स तसेच ३०० ग्रॅम चांदीचा तुकडा असा सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय राठोड करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

461 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क