छत्रपती संभाजीनगर : विश्वभारती कॉलनीजवळील ओंकारेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी रात्री गंठण हिसकावून चोरीची घटना घडली. या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी कृष्णा टेहरे (वय २५) या आपल्या सासू शोभा टेहरे यांच्यासोबत मंगळवारी (१० मार्च) रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या ओंकारेश्वर मंदिराच्या दिशेने पायी जात होत्या. दरम्यान, जोधपूर स्वीट्ससमोरून रोपळेकर चौकाकडे जात असताना समोरून एका दुचाकीवर दोन तरुण आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने अचानक पल्लवी टेहरे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले.

घटना इतक्या वेगाने घडली की पल्लवी टेहरे आणि त्यांच्या सासूला काही क्षण काय झाले हेही समजले नाही. गंठण हिसकावल्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून चेतक घोडा चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

घटनेनंतर पल्लवी टेहरे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वानखेडे करीत आहेत.

दरम्यान, घटनेच्या ठिकाणाजवळील दुकाने आणि परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच आरोपींचा माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अलीकडे शहरात अशा प्रकारच्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

769 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क