छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-६ परिसरातील साईनगर येथे शनिवारी (२८ मार्च) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ३१ वर्षीय समीर राजेंद्र नाईक यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर यांच्या उजव्या कानाजवळून झाडलेली गोळी डोक्याच्या आरपार गेली आहे. ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांचा लहान भाऊ घरी परतला आणि हा प्रकार उघडकीस आला. भावाने आरडाओरड करताच शेजारील नागरिकांनी धाव घेतली. घरातच पिस्तूल पडलेले आढळल्याने सर्वजण घाबरून गेले. तत्काळ सिडको पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

समीर हे पौरोहित्याचे काम करत असून आई व २८ वर्षीय भावासह साईनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे वडील वारलेले असून आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवतात. घटनेच्या वेळी आई दुकानात गेली होती आणि समीर घरी एकटेच होते.

घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी व सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून रिकामे काडतूस, कागदपत्रे व डायरी जप्त केली आहे.

दरम्यान, जखमी समीर यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. परत त्यानंतर सेशन कोर्ट समोरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी  दिली. समीर यांनी पिस्तूल कोठून आणले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

848 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क