छत्रपती संभाजीनगर : शहरात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबईतील मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. ही कारवाई २८ मार्च रोजी नेहरू भवनसमोर करण्यात आली. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोहेल मेहमूद शेख (२४, रा. कपडा बाजार, उस्मानपुरा), सलमान महेमूद शेख (२६, रा. कबाडीपुरा, बुढीलेन), अब्दुल रहेमान अदनान हिलाबी (२६, रा. किराडपुरा) आणि शेख जुनैद अब्दुल रऊफ (२३, रा. किराडपुरा) यांचा समावेश आहे. आरोपींकडून ७९ हजार ३०० रुपयांचे ४९.३१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान शेख हा मुंबईहून एमडी ड्रग्ज आणून शहरात विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून नेहरू भवनसमोरील पाशा हॉटेलजवळील गल्लीत चौघांना रंगेहात पकडले.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, सोहेल आणि सलमान हे सख्खे भाऊ असून ते गेल्या दोन वर्षांपासून संभाजीनगरात राहत आहेत. सलमानची सासरवाडी येथे असल्याने त्यांचे मुंबईला वारंवार येणे-जाणे होते. याचदरम्यान तो एमडी ड्रग्ज आणून सोहेल व इतरांच्या मदतीने शहरात विक्री करत होता. यापूर्वीही त्याने दोन ते तीन वेळा ड्रग्ज पुरवठा केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, जुनैद आणि अब्दुल रहेमान हे ग्राहक होते की पेडलर्स, याबाबतचा तपास सुरू असून फरहान नावाच्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*