छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ परिसरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पुरोहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर नाईक (वय ३४) असे मृत तरुणाचे नाव असून, जवळपास ३० तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी (२९ मार्च) पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.

समीर नाईक हा धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करत होता. वडिलांच्या निधनानंतर तो आई व धाकट्या भावासह राहत होता. शनिवारी रात्री घरात कोणीही नसताना त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही वेळाने आई घरी परतल्यानंतर समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तिच्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत केली आणि त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

घटनास्थळी पोलिसांनी तपास केला असता समीरने स्वतःच्या इच्छेने जीव देत असल्याची चिठ्ठी आढळून आली. तसेच त्याच्या खोलीत सुमारे ३५० भांगसदृश गोळ्या, १५० ते २०० दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि एक एअरगन आढळून आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी समीरचा मोबाईल जप्त केला असून त्याच्या आधारे शस्त्र व अमली पदार्थ पुरवणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, समीरचा उज्जैन येथे वारंवार वावर असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील काही भागांतून गावठी कट्टे पुरवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर समीरनेही तेथूनच शस्त्र आणले असावे, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,439 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क