छत्रपती संभाजीनगर : शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, साड्या वाटपाच्या आमिषाने दोन भामट्यांनी ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना १३ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुलमंडी येथील तनवाणी कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी २६ मार्च रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध महिला अंगुरीबाग परिसरात वास्तव्यास असून त्या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या आईने लग्नावेळी दिलेले ५ ग्रॅमचे झुमके आणि ५ ग्रॅम सोन्याची पोत असे एकूण १ तोळा सोन्याचे दागिने त्या नेहमी अंगावर घालत असत. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

गुलमंडी परिसरात पोहोचताच दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना गाठले. गरीब महिलांसाठी साड्या वाटप सुरू असल्याचे सांगून त्यांनी वृद्धेला विश्वासात घेतले. मात्र, “तुमच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत, त्यामुळे तुम्हाला साडी मिळणार नाही,” असे सांगत त्यांनी दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वृद्ध महिलेने दागिने काढून रुमालात बांधले.

यानंतर भामट्यांनी वृद्धेला कुरकुरेचे पाकिट देत तिचे लक्ष दुसरीकडे वळवले आणि क्षणात दागिने असलेला रुमाल घेऊन ते पसार झाले. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिला हताश झाल्या. त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सुधाकर मिसाळ करत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

684 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क