छत्रपती संभाजीनगर :  शहरात उद्या म्हणजेच मंगळवारी (३१ मार्च) भगवान महावीर जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील महावीर चौकातील भगवान महावीर स्मारकास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत महावीर चौक परिसरातील काही महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये लोखंडी पूल ते सेशन कोर्ट (जालना रोड) हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. तसेच कार्तिकी सिग्नल ते पंचवटी चौक या मार्गावरील महावीर चौक उड्डाणपुलाखालून जाणारी ये-जा करणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे.

 

बंद राहणारे मार्ग : 

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खालील प्रमुख रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत:

  • लोखंडी पूल ते सेशन कोर्ट (जालना रोड): या मार्गावरून येणारी आणि जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
  • कार्तिकी सिग्नल ते पंचवटी चौक: महावीर चौक उड्डाणपुलाखालून जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णतः बंद राहील.

 

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग : 

वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने खालील पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत:

  • १. रेल्वे स्टेशन ते बसस्थानक: या मार्गावरील सर्व वाहने महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) उड्डाणपुलावरून ये-जा करतील. पुलाखालचा रस्ता वापरास मनाई असेल.
  • २. रेल्वे स्टेशन ते छावणी/पडेगाव/अहिल्यानगर: ही वाहने रेल्वे स्टेशनकडून पंचवटी चौक मार्गे मार्गस्थ होतील.
  • ३. जालना रोडकडून (सेशन कोर्ट) येणारी वाहने: ही वाहने कोकणवाडी चौक आणि पंचवटी चौकमार्गे आपल्या इच्छित स्थळी जातील.
  • ४. मध्यवर्ती बसस्थानकाकडून (कार्तिकी सिग्नल) येणारी वाहने: बसस्थानकाकडून येणाऱ्या सर्व वाहनांनी महावीर चौक उड्डाणपुलाचा वापर करणे अनिवार्य आहे.

पोलिस प्रशासनाने नागरिकांनी या वाहतूक बदलांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सणोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

882 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क