छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात आणि कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना गॅस सिलिंडर घरपोचच वितरित करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. गॅस वितरणासंदर्भात वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी नितीन बजाज, शुभम चौहान तसेच विविध गॅस एजन्सीधारक उपस्थित होते. सध्या जिल्ह्यात गॅस बुकिंगचे प्रमाण वाढले असून, युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये साठवणुकीची प्रवृत्ती वाढल्याचे निदर्शनास आले. मात्र, मार्च-एप्रिल महिन्याच्या सरासरीप्रमाणेच पुरवठा होत असल्याचे कंपनी प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

गॅस बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत असतानाही अनेक ग्राहक थेट एजन्सीकडे सिलिंडर घेऊन गर्दी करत असल्याचे एजन्सीधारकांनी सांगितले. यावर जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की, कोणताही ग्राहक एजन्सीवर येऊ नये. बुकिंग केल्यानंतर संबंधित ग्राहकाला घरपोच सिलिंडर देणे बंधनकारक आहे.

सध्या नवीन गॅस जोडणी प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून काही ग्राहकांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. ही प्रक्रिया नागरिकांनी ऑनलाइन पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले. गॅस वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाने एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असून पुढील २४ तासांत वितरण व्यवस्था सुरळीत न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, काही भागात गॅस वितरणासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज असल्याचे एजन्सीधारकांनी सांगितले. त्यानुसार गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले. नागरिकांनी संयम राखत अधिकृत पद्धतीने बुकिंग करूनच गॅस मिळवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

633 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क