छत्रपती संभाजीनगर : शहरातील न्यायालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पोलिस आणि न्यायव्यवस्थेची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एका पंचविशीतील तरुणाने न्यायालय परिसरात एका वकिलाला भेटून “मला १४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे आहे, कायद्याची काही अडचण येईल का?” असा प्रश्न विचारला. यानंतर संपूर्ण घटनाक्रमाने वेगळेच वळण घेतले.

वकिलांनी अधिक चौकशी केली असता त्या तरुणाने “मी तिला ६० हजार रुपयांत विकत घेतले आहे,” असे धक्कादायक उत्तर दिले. हे ऐकताच वकिलांना प्रकाराचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाला विश्वासात घेतले आणि “मुलीला घेऊन ये, आपण शपथपत्र तयार करू,” असे सांगून त्याला काही काळ गुंतवून ठेवले. दरम्यान, त्यांनी तातडीने मुख्य सरकारी वकिलांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.

मुख्य सरकारी वकिलांनी ही बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलिस आयुक्तांना माहिती देण्यात आली आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने सक्रिय झाले. वकिलांनी संवादातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे संबंधित तरुणाचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक शोधण्यात आला. पीआय गजानन कल्याणकर यांच्या पथकाने मोबाइल लोकेशन ट्रेस करून अवघ्या सहा तासांत त्या तरुणाच्या घरी धडक दिली.

चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. संबंधित तरुण मानसिक आजाराने त्रस्त असून तो मानसोपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणतीही मुलगी अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. “माझे लग्न होईल का?” असे प्रश्न तो सतत चॅटजीपीटीला विचारत असे. त्याच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेत काही मित्रांनी त्याला खोटी माहिती देत फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,024 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क