छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थेवर, बेरोजगारीवर आणि राजकीय घडामोडींवर उपरोधात्मक शैलीत भाष्य करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक अभिजित दीपके यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अभिजित दीपके यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या धमकीबाबत माहिती दिली. त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या कथित चॅटचा स्क्रीनशॉटही सार्वजनिक केला आहे. या स्क्रीनशॉटनुसार, एका अज्ञात आंतरराष्ट्रीय किंवा व्हीपीएन क्रमांकावरून त्यांना धमकीचे संदेश पाठविण्यात आले. “तुला हवे तितके पैसे मिळतील, तुझे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अकाउंट बंद कर, नाहीतर भाजपमध्ये प्रवेश कर. आमचे ऐकले नाहीस तर अमेरिकेतही तुला शोधून मारले जाईल,” असा थेट इशारा या संदेशात देण्यात आल्याचा दावा दीपके यांनी केला आहे.

“मला नुकतीच जीवे मारण्याची धमकी आली आहे,” अशा कॅप्शनसह त्यांनी ही पोस्ट शेअर केली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यांच्या समर्थकांनी आणि नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, अभिजित दीपके हे सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र या धमकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तातडीने हालचाली करत वाळूज परिसरातील त्यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांची अधिकृत व्हॅन आणि सशस्त्र कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या आई-वडिलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,132 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क