छत्रपती संभाजीनगर :  शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढत असल्याने वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई सुरू केली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणे, राँगसाईड वाहन चालविणे, सिग्नलचे उल्लंघन करणे तसेच ट्रिपलसीट प्रवास करणे यासारख्या प्रकारांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर ९ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या सात तासांच्या कालावधीत वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत राँगसाईड वाहन चालविणाऱ्या तब्बल ९६६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सुमारे ६ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुजंग यांनी दिली.

मोंढानाका, सिटीचौक, सेव्हनहिल चौक, आकाशवाणी चौक, जळगाव टी पॉइंट, एपीआय कॉर्नर, हायकोर्ट सिग्नल, सेशन कोर्ट सिग्नल, बाराभाई ताजिया परिसर, रंगार गल्ली, मिलिंद चौक, नगरनाका, महावीर चौक, ओअॅसिस चौक तसेच वाळूज गाव परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

861 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क